• MyPassion
व्याजाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले गजाआड.
20 Jul, 2019

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून आकर्षक व्याजाच अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्यांचं मध्यप्रदेश येथे सुरु असलेलं कॉल सेंटर वर देखील कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्या कडून ५० लाख हुन अधिक रुपयाची फसवणूक केल्याचे समोर आलेले आहे या प्रकरणी अरविंद चौहान आणि तपेश शर्मा या दोघांना अटक केली आहे या प्रकरणी कळवा येथे राहणारे विलास नेवासकर यासिनही २ लाख १६ हजार रुपयाची फसवणूक केल्या नंतर त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सदरची कारवाई केली आहे देशभरातील अनेक नागरिकांशी बनावट सिमकार्ड असणाऱ्या मोबाईल द्वारे संपर्क साधून खोट्या नावाचा परिचय देऊन तुमचं डी मॅट अकॉउंट उघडायचे आहे असं सांगून नामांकित बँकेच्या बनावट खात्यात रोख रक्कम जमा करण्यास सांगत होते परंतु सदरची रक्कम शेअर बाजारात न गुंतवता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून लोकांची फसवणूक करीत असल्याची समोर आले असताना ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेश मधील विजय नगर येथील शगुन आर्केड इमारतीमध्ये छापा मारून बोगस कॉल सेंटर उध्वस्त करून संगणकाच्या ५९ हार्ड डिस्क,२६ वायरलेस आणि चार मोबाईल तसेच इतर कागदपत्र हस्तगत केली आहेत या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात ४२०,४६५,४६७,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत