• MyPassion
विधानसभा  निवडणुकीच्या तोंडावर भाजप- शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर.
19 Sep, 2019

युतीवरून शिवसेना-भाजपमध्ये विसंवादसुरु असतानाच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप- शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर येऊलागला आहे.मिरा-भाईंदर महापालिकेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादातून राज्यात युती झालीतरी चालेल मात्र मिरा-भाईंदरमध्ये युती होणार नाही.असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेहोते.आता ठाणे महापालिकेच्या भाजप नगरसेवकांनी देखील शिवसेनेवर आगपाखड करण्यास सुरुवातकेली असून एकप्रकारे शिवसेनेला कोंडीत पकडण्यात सुरवात केली असल्याचे पाहायला मिळतआहे. पक्ष श्रेष्ठींनी असे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून एकप्रकारेशिवसेनेवर दबावतंत्राचा अवलंब केलं जात आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहातीसत्ता असल्याने भाजपला विरोधात बसावे लागले आहे.त्यामुळे भाजपकडून नेहमीच महासभेत सेनेचीकोंडी केली जात असते.आता तर,पावसाळ्यात ठाण्यात पडलेले खड्डे या संबंधात देखील काहीदिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या विरोधात आंदोलन केले.तर, कधी महापालिकेच्याभूखंडासंदर्भात निवेदन,आंदोलन केले.नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देखीलनगरसेवकांनी डेब्रिज,रस्ते या विषयावर शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यावरूनचनिवडणुकीत शिवसेनेवर दबाबतंत्र टाकण्याचे काम भाजपच्या नगरसेवकांनी करावे असे आदेशपक्षश्रेष्ठीनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरचवाजणार आहे. आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यातच युती संदर्भात अजून कोणताहीनिर्णय लागला नसून जागावाटप देखील झालेले नाही. दरम्यान राज्यासह ठाण्यात शिवसेनेलाकोंडीत पकडले आहे.