• MyPassion
वाहतूक पोलिसांची विनाहेल्मेट वाहन चालविणा-यांवर करडी नजर .
07 Jun, 2019

मुंबई शहरासह उपनगरात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाच्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. ठाणे शहरातही वाहतूक शाखेने जानेवारी २०१९ ते मे २०१९ या पाच महिन्यांच्या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणा-यांवर करडी नजर ठेवत १५ हजार १९३दुचाकी चालकावर | कारवाईचा बडगा उगारत तब्बल २१ लाख ५ हजार ३०० रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात वाहतुकीचे नियम न पाळल्याने घडत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पोलिसांच्या वतीने विना हेल्मेट वाहन चालविण्याबरोबरच मद्यपान करून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणा-यांवर कारवाई करण्यात येते. जानेवारी २०१९ पासून मे २०१९ पर्यंत ठाणे वाहतूक शाखेने १५ हजार १९३ विना हेल्मेटधारक चालकांवर कारवाई केली असून २१ लाख ५ हजार ३०० रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल केला आहे. वाहतूक शाखेकडून नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना आणि जनजागृतीचे उपक्रम वाहनचालकांसाठी राबविण्यात येतात. परंतु, कारवाई झालेल्यांची संख्या पाहता वाहन चालकांमध्ये याबाबत जागृती नसल्याचे दिसते. पोलीस कारवाई करून दंड वसूल करत असले तरीही कायदा मोडणा-यांची संख्या वाढतच आहे. यामुळे वाहतूक शाखेकडून वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती होत असूनही वाहन चालकांमध्ये कोणत्याही प्रकारची जागृती होत नसल्याचे दिसत आहे.