• MyPassion
वाहतूक पोलिसांना मारहाण करणार्यांना पोलिसांनी केली अटक .
21 Aug, 2019

पुन्हा एकदा पोलिसांवर हात टाकण्याचा प्रकार ठाण्यात घडलाय... गेल्याच आठवड्यात कळवा येथे कारवाई केली म्हणून एका वाहतूक पोलीस अधिका-याची काॅलर पकडण्याचा प्रकार ताजा असताना आज संध्याकाळी मुंब्रा येथे कारवाई केली म्हणून चार वाहतूक पोलीस हवालदारांवर मुंब्रातील काही तरुणांनी हल्ला केला आणि पोलीसांचे शर्ट फाडले, त्याचा गळा आवळला भर चौकात त्यांना मारहाण केली हा धक्कादायक प्रकार घडलाय एका जागृक नागरिकाने हा सर्व प्रकार कॅमे-यांत कैद केल्याने उघडकीस आला ... काॅन्सटेबल अंगद मुंडे, प्रशांत गोसावी, दिनेश राऊत आणि विनायक वाघमारे हे वाहतूक पोलीस कारवाई करत होते कारण मुंब्रा येथे नंबर प्लेट कागदपत्र नसलेल्या शेकडो गाड्या रोज फिरत असतात या गाड्या चोरीच्या आहेत अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती यामुळे वाहतूक पोलिसांनी याच कारवाईचा एक भाग म्हणून काही गाड्या जप्त केल्या होत्या आणि गाडीचे पेपर दाखवून गाडी घेऊन जावा अशी सुचना गाडी मालकांना दिली होती मात्र आमच्यावर का कारवाई केली असा उलट प्रश्न विचारत ४ तरुणांनी थेट वाहतूक पोलीसांवर हात उचलला ... हा संताप आणणारा प्रकार सगळ्यांसमोर घडत होता मात्र कोणीही त्या पोलीसांच्या मदतीला धावून आले नाही ... या घटनेनंतर पोलिसांनी अफनान कुरेशी, फैजान शेख, शमसुद्दीन बांगी आणि तमसील कुरेशी असा चार तरुणांवर गुन्हा दाखल करुन यांतील तिघांना अटक केली असून एक जण फरार आहे.अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे .