• MyPassion
15 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील सर्व मदरशात तिरंगा फडकावणे आणि राष्ट्रगीत गाणं अनिवार्य .
11 Aug, 2017

येत्या 15 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील सर्व मदरशात तिरंगा फडकावणे आणि राष्ट्रगीत गाणं अनिवार्य करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेने सर्व मदरशांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. इतकंच नाही तर या कार्यक्रमाचं व्हिडीओ शूटिंग आणि फोटोही काढण्याचे निर्देश दिले आहेत. मदरसा शिक्षण परिषदेने पत्र जारी करुन, सर्व जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत. प्रत्येक मदरशात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करा. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाचं व्हिडीओ शूटिंग करा, जेणेकरुन भविष्यात अशा कार्यक्रमांचं उदाहरण देता येईल. असा आदेश देण्यात आला आहे .