• MyPassion
यूआयडीएआय' नावाने सेव्ह झालेला नंबर विषयी गुगलची माफी
04 Aug, 2018

देशभरातल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये शुक्रवारी अचानकपणे 'यूआयडीएआय' नावाने १८००३००१९४७ हा क्रमांक अपोआप सेव्ह झाला. यामुळे हा मोबाईल हॅकिंगचातर प्रकार नाही ना, अशी शंकाही निर्माण झाली होती. मात्र आता, अॅन्ड्रॉइडची मूळ कंपनी असलेल्या गुगलने स्वतः स्पष्टीकरण देत या प्रकरणावर पडदा टाकला आहे. याप्रकरणी गुगलने आमच्यामुळेच हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह झाल्याचे म्हणत चूक कबूल केली आहे. यावर स्पष्टीकरण देताना गुगलने माफी मागितली आहे. यामुळे हा क्रमांक सेव्ह होणे हा सायबर अॅटॅक नसून गुगलचीच चूक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यूआयडीएआयसह इतरही ११२ हेल्पलाईन क्रमांक २०१४ ला अॅन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये कोड करण्यात आले होते. मात्र, सेव्ह झालेला यूआयडीएआय क्रमांक तुम्ही डिलीट करू शकता. आम्ही नवीन अॅन्ड्रॉईड सेटअपमध्ये हा क्रमांक येऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत. लोकांना यामुळे त्रास झाला याबद्दल आम्हाला खेद आहे, असे म्हणत गुगलने याप्रकरणी माफी मागितली आहे. यावर स्पष्टीकरण देताना यूआयडीएआयने आधारचा हेल्पलाईन क्रमांक '१९४७' असून तो गेल्या दोनवर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. तसेच एकाही मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीला वा मोबाईल तयार करणाऱ्या कंपनीला १८००३००१९४७ हा किंवा १९४७ हा क्रमांक सेव्ह करण्यास आम्ही सांगितलेले नाही, असे ट्विट यूआयडीएआयने केले आहे.