• MyPassion
उड्डाण पुलावरील खड्डे तत्काळ भरण्याच्या आयुक्तांच्या सूचना.
05 Oct, 2019

संततधार पावसाने उसंती घेतल्यानंतरठाणे शहरातील रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर सुरूकेले आहे. गुरुवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात विविध ठिकाणी सुरूअसलेल्या कामाची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधितविभागास दिले.आयुक्तांनी पातलीपाडा, आनंदनगर बसडेपो, होरायझन शाळा, लालानी रेसिडेन्सी, ब्रह्मांड, एअर फोर्स स्टेशन, कोलशेत, ढोकाळीनाका मुलुंड चेक नाका आणि इतर ठिकाणी रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तसेच कामाचीगती व दर्जा या विषयी अभियंत्यांना सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी ब्रह्मांडते गायमुख या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची पाहणी करून सर्व खड्डे बुजवण्याचे तसेचदोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करण्याचे आदेश नगर अभियंता रवींद्र खडताळेयांना दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येतअसलेल्या उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करून महामंडळाचे उपअभियंता अनिरूद्धबोराडे यांनाही उड्डाण पुलावरील खड्डे तत्काळ भरण्याच्या सूचना केल्या.