• MyPassion
टीएमटीचा आणखी एक भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर.
21 Dec, 2019

टीएमटीचा भोंगळ कारभार सर्वश्रुत असूनगुरुवारच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत टीएमटीचा आणखी एक भोंगळ कारभार चव्हाट्यावरआला. काही कर्मचारी सेवानिवृत्त तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही प्रशासनाने बदलीदाखविल्याचा आरोप एका नगरसेवकाने केल्याने खळबळ उडाली. ही अतिशय गंभीर बाब असल्याचेया नगरसेवकाचे म्हणणे होते.शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ भोईर यांनीसर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या तासात ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा मुद्दाउपस्थित केला होता. टीएमटीमध्ये सध्या किती अधिकारी आणि कर्मचारी आहेत, सेवानिवृत्तकर्मचारी आस्थापनेवर कार्यरत आहेत का? मृत कर्मचाऱ्यांची नोंद आहे का? तसेच आस्थापनेवरनोंद दर्शवली जाते का? आदी विविध प्रश्नांची माहिती टीएमटी प्रशासनाकडे विचारली होती.यावर त्यांना 'नाही' असे उत्तर देण्यात आले होते. मात्र आजही काही कर्मचाऱ्यांची आस्थापनेवरबदली दाखवण्यात आली आहे. तसेच त्यांचे पगारही निघत असल्याचा गौप्यस्फोट भोईर यांनीकेला. याबाबत टीएमटी प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. चुकीची माहिती देणाऱ्यात्या संबंधित अधिकाऱ्यांना अगोदरच कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात आले.तसेच चौकशी केली असता पगार निघत नसून चुकून सेवेत नावे दाखवण्यात आल्याचे प्रशासनाचेम्हणणे होते.जे कर्मचारी कामावर नाहीत, सेवानिवृत्तआहेत तसेच काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असूनही त्यांची आस्थापनेवर बदली दाखवण्यातआलेली आहे. ही गंभीर बाब असल्याचे भोईर यांचे म्हणणे होते. या आरोपावर उत्तर देतानाही चूक दुरुस्त केलेली असल्याचे टीएमटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच संबधित अधिकाऱ्यांनासमज दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकारी निष्काळजीपणाने काम करत असल्यास त्यांच्यावरकारवाई का होत नाही असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. एक कर्मचारी मृत असूनही त्याचीआस्थापनेवर बदली दाखवण्यात आली असून बदलीची यादी माझ्याकडे असल्याचे त्यांचे म्हणणेहोते.