• MyPassion
ठाण्यातील उपवन तलावात महिलेची आत्महत्या .
02 May, 2019

ठाण्यामध्ये काल एका महिलेनं उपवन तलावात उडी घेऊन आत्महत्या केली तर आज एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना वेळीच धाव घेतल्यानं ही आत्महत्या टळली. काल रात्री भेकनी यादव या ४९ वर्षीय महिलेनं उपवन तलावात उडी मारून आत्महत्या केली. तिनं उडी मारल्याचं समजताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं या महिलेचा उपवन तलावात शोध घेण्याचा प्रयत्न केला. ब-याच शोधानंतर तिचं पार्थिव अग्निशमन दलाला मिळाला तर आज सकाळी सविता गायकवाड या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रायगड गल्लीतील पंकजा इमारतीत राहणा-या सविता गायकवाड या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील सज्जावर बसून उडी मारण्याच्या प्रयत्नात होत्या. रहिवाशांनी हा प्रकार पाहून अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलानं त्वरीत धाव घेऊन सविता गायकवाड यांची सुटका केली. गायकवाड यांना कौशल्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.