• MyPassion
ठाण्यातील रामचंद्र नगर येथील खचला रस्ता .
15 Jun, 2019

ठाण्यातील कामगार हॉस्पिटल परिसरात रात्री ११.३० च्या सुमारास रस्ता खचल्याची घटना घडली आहे . हा रस्ता खचल्यानंतर रस्ताच्या कडेला पार्क असलेल्या गाड्या खड्ड्यात पडून तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे . यामध्ये एक कार आणि एका रिक्षाचा समावेश आहे . ज्या बाजूने रस्ता खचला आहे त्या बाजूने इमारतीचे काम सुरु असून या इमारतीसाठी खड्डा खोदण्यात आल्याने रस्ता खचला असल्याचे चर्चा आहे . घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोचून खड्ड्यात पडलेली वाहने बाहेर काढण्यात आली . रात्री ११.३०च्या सुमारास कामगार रुग्णालयाजवळील रामचंद्र नगर येथे राजमुद्रा सोसायटीजवळ अचानक रस्ता खचला आणि घटनास्थळी उभ्या असलेल्या दोन कार आणि एक रिक्षा कोसळल्या. या वाहनांमध्ये एकही व्यक्ती उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसंच कोणी जखमीही झालेले नाही. रस्ता खचण्यामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नसले तरी, इमारतीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे हा रस्ता खचला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नुकसान झालेल्या वाहनांमध्ये मारुती सुजूकी अर्टिगा, मारुती वॅगनर,आणि रिक्षाचे नुकसान झाले आहे . अर्टिगा ही रवींद्र गरुड यांच्या मालकीची असून वॅगनर आणि रिक्षा कोणाच्या मालकीची आहे याची माहिती मिळू शकलेली नाही . मात्र रस्ता खचल्याची घटना या पावसाळ्यातील पहिलीच घटना आहे .