• MyPassion
ठाण्यातील पत्रकारांची विशेष कार्यकारी अधिकारीपदाची झाली नियुक्ती .
19 Jul, 2019

ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अथक पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी पदांवर ठाण्यातील पत्रकारांची नियुक्ती करून हॅट्ट्रिक साधली आहे. शासनाच्या 10 जुलैच्या राजपत्रामध्ये यादीत ठाणे जिल्हयातील 114 जणांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात ठाण्यातील 21 पत्रकारांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी विशेष मेहनत करून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. यापूर्वी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या पाठपुराव्यामुळे युती सरकाराच्या कालावधीत पालकमंत्री गणेश नाईक यांनी 1995 मध्ये 32 पत्रकारांची विशेष कार्यकारी दंडाधिकारीपदी नियुक्ती केली. आघाडी सरकारच्या काळात ही पालकमंत्री गणेश नाईक यांनी 22 पत्रकारांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त्या केल्या होत्या. दरम्यान युती सरकारने जाहीर केलेल्या यादीत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, संपादक मिलिंद बल्लाळ, दीपक दळवी, तुषार राजे, प्रशांत कांबळी, जेष्ठ पत्रकार दिलीप शिंदे, आनंद कांबळे, माधव डोळे, जयदास मोरे, रामअनुज सिंह, प्रशांत सिनकर, गणेश भोईटे, उज्वला शेलार, सुरेश सोंडकर,नरेंद्र कसबे, धिरेंद्र उपाध्याय, अनिल शिंदे,राजेंद्र अहिरे, कुमार बडदे, प्रफुल्ल गांगुर्डे,अमोल पवार या पत्रकारांचा समावेश आहे. विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झालेल्या पत्रकारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.