• MyPassion
ठाण्यातील एका धार्मिक कार्यक्रमात ऐकण्यात आली 'मी पुन्हा येईन' ची हाळी .
14 Dec, 2019

विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईन अशी हाळी देणाऱ्या माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातही एका धार्मिक कार्यक्रमात पुढच्या वर्षी नक्की येईन असे विधान केल्याने राजकीय तसेच उपस्तीतामध्ये चांगलीच खसखस पिकली. ठाण्यातील कोपरी येथे न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात जनकल्याणार्थी सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस दरवर्षी हजेरी लावत असतात यंदा देखील फडणवीस देवीच्या दर्शनासाठी आले होते, यावेळी पुढच्या वर्षी मी नक्की येईन असे विधान फडणवीस यांनी केले. दरम्यान माध्यमांनी या संदर्भात एकनाथ खडसे या विषयावर छेडले असता फडणवीस यांनी हात जोडून मुंबईला रवाना झाले. राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मनाली संदीप कुलकर्णी ए पी जी अब्दुल कलाम 2006 साली पाणी शुद्ध करण्याच्या पारंपरिक पद्धती प्रॉजेट बेस्ट क्रिएटिव्ह चाईल्ड म्हणून 25 हजार धनादेश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला..तसेच नागरिक्तव बिल बाबत भाजप सरकारचे आणि फडणवीस यांची सिंधी समाज कडून सत्कार करण्यात आला.