• MyPassion
ठाण्यात पडलेल्या खड्यांच्या निषेधार्थ भाजपकडून पालिका प्रशासनाला फोटो फ्रेम भेट.
19 Sep, 2019

ठाणेकरांना चंद्रावर घेऊन गेल्याबद्दलठाणे महापालिका प्रशासनाचे धन्यवाद. त्रस्त ठाणेकर जनतेकडून सप्रेम भेट.असा संदेश लिहिलेलीखड्यांची प्रतिमा असलेली फोटो फ्रेम भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेचे नगर अभियंता रवींद्रखडताळे याना दिल्याने पुन्हा एकदा भाजप विरुद्ध मनपा प्रशासन असा वादंग उभा ठाकला आहे.ठाण्यातीलरस्त्यांवर पडलेल्या खड्यामुळे ठाणेकर नागरिक त्रस्त झाले असून तमाम ठाणेकरांच्यावतीनेही आगळीवेगळी भेट पालिका प्रशासनाला दिल्याचे भाजप गटनेते नारायण पवार यांनी सांगितले. ठाणे महापापालिकेत गेले काहीदिवस भाजपच्या नगरसेवकांकडून ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अन्य अधिकाऱ्यांनालक्ष केले जात आहे.यापूर्वी महासभेला आयुक्तांसह अधिकारी वर्ग अनुपस्थित राहिल्यानेसभागृहात चक्क आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या प्रस्तावाच्या चर्चेत भाजपच्या नगरसेवकांनी सहभाग घेतला होता.तसेच,याविषयी विशेष महासभा घ्यावी.असाप्रस्ताव मांडला होता.त्यानंतर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवरून प्रशासनालालक्ष करीत चक्क महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडले होते.या आंदोलनात या अधिकाऱ्यांचेकरायचे काय खाली डोके वर पाय.अशी खिल्लीदेखील उडवली होती.तर,आता खड्यांची छायाचित्रेअसलेली फोटो फ्रेम बनवून ठाणेकरांना चंद्रावर घेऊन गेल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्तकेल्याने चर्चेचा विषय बनला आहे.पालिकेचे नगर अभियंता यांच्या दालनात जाऊन भाजपच्यानगरसेवकांनी ही प्रतीकात्मक फोटो फ्रेम भेट दिल्याने, पुन्हा एकदा भाजप विरुद्ध प्रशासनअशा नव्या वादाला तोंड फुटले आहे.