• MyPassion
ठाण्यात नागरिकत्व बिलाच्या समर्थनार्थ काढण्यात आली जनफेरी .
23 Dec, 2019

एकीकडे सुधारित नागरिकत्व बिलाच्या विरोधात राज्यभरासह देशात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले असताना दुसरीकडे मात्र या बिलाच्या समर्थनार्थ ठाण्यात अनोखी जनफेरी काढण्यात आली. सदर जनफेरीचे आयोजन राष्ट्रीय मतदाता मंच आणि विश्वास सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते, ठाण्यातील जांभळी नाका येथून सुरू झालेली ही जनफेरी रंगो बापूजी गुप्ते चौक होऊन पुढे या जनफेरीचा समारोप घंटाळी मैदान येथे झाला. या रैली मध्ये ठाणेकर आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या या बिलाला पाठींबा दर्शविला. यावेळी "भारत माता की जय" सुधारित बिला बाबत देखील स्वागत केले असून हे सुधारित विधायक बिल रद्द न होण्यासाठी ठाणेकर आणि भाजप कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी मात्र या विधेयकवरून बरीच मतमतांतरे आहेत. काँग्रेस सह अनेक पक्षांनी या विधेयकाला विरोध केलेला होता, काही राजकीय पक्षांनीही या विधेयकावर काही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र ठाण्यात सामाजिक संघटनेच्या वतीने या विधेयकाचे समर्थन करण्यात आले असून हजारोच्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत. या आंदोलनाचे पडसाद अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. मुंबई, ठाणे, भिवंडी या ठिकाणी मुस्लिम समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. दरम्यान एकीकडे या विधेयकाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत.