• MyPassion
ठाण्यात मेंनहोल ची निकृष्ट दर्जाची झाकणे बदलण्याची नागरिकांची मागणी .
04 Jul, 2019

गेल्या चार ते पाच दिवस पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील अनेक सखोल भागात पाणी साचताना दिसले .याच पावसा मध्ये ठाणेकर वाट काढत चालत असतात.अशातच ठाणे शहरातील काही ठिकाणी या मुख्य ठिकाणी मेंनहोल चे झाकण निघाले असून काही भागात याच मेन होल ची झाकणे निकृष्ट दर्जाची झाली असून या मध्ये नागरीक चालत असताना त्याचा तोल जाऊन आत जाऊ शकतात आणि त्याचा जीव ही जाऊ शकतो त्यामुळे ठाणे महापालिकेने यावर लवकरात लवकर तोडगा काढला अशी नागरिकांची मागणी आहे. ठाणे शहरात गेले अनेक दिवस नौपाडा ,जांभळी नाका,कोपरी आणि ठाणे स्थानक परिसरात अनेक मेन होल, ड्रेनेज आणि नाल्यावरची झाकणे निकृष्ट आणि नाहीशी झाली आहे.पाऊस जर मोठा पडला तर या ठिकाणची मेन होल ची झाकणे दिसत नाही आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहने व ठाणेकरांना याचा नाहक त्रास होतो.पावसात सामान्य जनता आपली वाट काढून जात असतात त्यामुळे अशा उघद्यावरील आणि निकृष्ट दर्जाचे झाकणे जीव घेणी झाली आहे.त्यामुळे ठाणे महापालिकेने यावर तोडगा काढून लवकरात लवकर या झाकणाच्या बाबत उपाय योजना करावी अशी ठाणेकर मागणी करीत आहे.