• MyPassion
ठाण्यात मध्य रेल्वेच्या ५व्या तसाच ६व्या मार्गिकेच्या कामाला पुन्हा सुरवात .
08 May, 2019

मध्य रेल्वेसाठी आणि तिच्या प्रवाश्यांसाठी निकराचा असलेला 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेचा प्रकल्प आणि वेगाने पूर्ण होऊ शकतो. कारण या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मुंबई रेल विकास प्राधिकरण म्हणजेच एमआरव्हीसीला मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या मार्च एप्रिल पर्यंत 5वी आणि 6वी मार्गिका तयार होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. मुंब्रा आणि कळवा मधील खाडी किनारी बांधण्यात येत असलेला उन्नत मार्ग पर्यावरणाच्या अनेक परवानग्या न मिळाल्याने गेली अनेक वर्षे रखडला होता. आता त्यामुळे कुर्ला ते ठाणे आणि कल्याण ते दिवा अशी तयार असलेली 5 वी आणि 6 मार्गिका दिवा आणि ठाणेच्या मध्ये बांधण्यास विलंब होत होता. आता मात्र परवानग्या मिळाल्याने हे काम पुन्हा सुरू झाले आहे