• MyPassion
ठाण्यात चिमुरड्यांसाठी उभारण्यात आले चिल्ड्रन बस शेल्टर .
07 Jan, 2020

शाळकरी मुलांना शाळेत जाताना घरातून रस्त्यांवर उभे राहून शाळेच्या बसची, व्हॅनची वाट बघावी लागते. उन्हाळ्यात , पावसाळयात मात्र मुलांसह त्यांच्या पालकांची देखील तारेवरची कसरत होत असते. पावसाळ्यात हवेमुळे छत्र्या उडतात त्यामुळे शाळेत जाण्याच्या आधीच मुले चिंब भिजुन जातात. तर उन्हाळ्यात तळपत्या उन्हात उभे राहावे लागत असल्यामुळे शाळेत जाऊच नये असे चिमुरड्याना वाटत असते. यासाठी फक्त लहान मुलांकरीता बस शेल्टर उभारण्याची संकल्पना नगरसेवक पूर्वश सरनाईक याना आली. त्यावेळी त्यांनी चिल्ड्रन बस शेल्टरमध्ये मुलांना कसे आकर्षित वाटेल त्यासाठी त्यांच्या आवडीचे कार्टून्सचा वापर करून ते बस शेल्टर तयार केले. प्रभाग क्रमांक १४ मध्ये आता पर्यंत पाच ठिकाणी हे चिल्ड्रन बस शेल्टर उभारण्यात आले आहे. अगोदरच्या टप्प्यात तीन ठिकाणी म्हणजेच दोस्ती विहार गृहसंकुल, कोरस नक्षत्र गृहसंकुल, रुणवाल प्लाझा गृहसंकुल या ३ ठिकाणी हे बस शेल्टर उभारण्यात आले होते आणि आता रविवार दि. ५ जानेवारी २०२० रोजी डवले नगर येथील बस डेपोच्या समोर आणि दुसरे वर्तक नगर येथील लक्ष्मी नारायण मंदिर येथे उभारण्यात आले तर लवकरच अन्य उरलेल्या दोन नुकते हे बस शेल्टर उभारण्यात येतील असे मत नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले. या २ चिल्ड्रन बस शेल्टरचे उदघाटन आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले असून नगरसेविका सौ. परिषा सरनाईक, नगरसेविका सौ . अशा डोंगरे, नगरसेविका सौ. कांचन चिंदरकर, नगरसेवक श्री. दशरथ पलांडे, नगरसेवक श्री. दिलीप बारटक्के, ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय नलावडे, ठाणे उपशहर प्रमुख भाई खाडे , विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व स्थानिक पदाधिकारी,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.