• MyPassion
ठाण्यात 10 रुपयात जेवण देण्याचा दोन तरुणांनी मिळवला मान .
21 Nov, 2019

एककिडे राजकीय पक्षांकडून दहा रुपयांच्या जेवणाच्याथाळीची घोषणा होत असताना आश्वासन देणाऱ्या सरकारचाच अजून पत्ता नाही.मात्र,दुसरीकडे10 रुपयात जेवण देण्याचा मान ठाण्याच्या या तरुणांनी मिळवला आहे. ठाण्यातील बाजारपेठेतबाबाचा ढाबा म्हणून छोटे खाणी हि सेवा सुरु करण्यात आलेली  आहे . विधानसभा निवडणुकीत 10 रुपयात थाळीदेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वांचेच लक्ष लागले होते परंतु सरकार काही होईनाआणि 10 रुपयात थाळीदेखील मिळेना अशी अवस्था बनली असतानाच ठाण्यातील दोन तरुणांनी अवघ्या10 रुपयात जेवण देण्याचा बेत तडीस नेला असून बाबाचा ढाबा म्हणून रविवारी या उपक्रमाचाशुभारंभ केला आहे.ठाण्यातील बाजारपेठ  परिसरात 10 रुपयात भाजी व भात असेजेवण मिळत असून भुकेल्यांसह गोरगरिबांची याठिकाणी झूबंड उडत आहे.तसेच दरम्यान,एकीकडेनिवडणुकीत आश्वासन देणारे राजकीय पक्ष अद्यापही सत्तासंघर्षात दंग असताना ठाणेकर तरुणांनीही योजना स्वतः सुरू करून राजकीय मंडळींना एकप्रकारे चपराक लगावली आहे.एकीकडे रोजगारआणि दुसरीकडे हि जण सेवा असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे . ठाणे पश्चिमेकडीलखारटन रोड परिसरात राहणाऱ्या दिनेश मेहरोल आणि सुनिल चेटोले यांनी गोरगरिबांची सेवाम्हणून हा ना नफा ना तोटा हा उपक्रम सुरु केला आहे.10 रुपयात भात आणि आमटी असे पौष्ठीकआणि रुचकर जेवण या द्वयीने देण्यास सुरुवात केल्याने कष्टकरी आणि कामगार वर्गासाठीएक पर्वणीच ठरली आहे.जेवण्यासाठी सुरवातीपासूनच अनेकांनी या ठिकाणी आपली हजेरीलावली .. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केलेअसून आश्वासन देणाऱ्या पक्षाने लवकरत लवकर सरकार स्थापन करून 10 रुपयात जेवण उपलब्धकरून द्यावे.अशी मागणीदेखील अनेकांनी या निमित्ताने केली आहे.