• MyPassion
ठाण्याच्या महापौरांना दाऊदच्या नावे धमकीचा  फोन .
19 Sep, 2019

ऐन विधानसभा निवडणुक तोंडावर आली असतानाठाण्याच्या महिला महापौर मिनाक्षी शिंदे यांना धमकीचे फोन, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमनावाने मिनाक्षी शिंदे यांना आला फोन, तुम्हाला कुटूंबात राहायचे आहे ना तर व्यवस्थितराहा, ठाण्यात कोणाशी पंगा घेऊ नका अश्या पध्दतीने फोन करून धमकावले असल्याचे समोरआले आहे. आम्ही छोटे गुंड नसून आमच्यापासून सावध रहा अश्या पध्दतीने धमकावले आहे. याबाबतमिनाक्षी शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. पुढील शोध ठाणेपोलीस करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापौर मिनाक्षी शिंदे यांनी उत्कृष्ट कामठाण्यात केले आहे. महापालिकेच्या महासभेत देखील ठोस निर्णय घेतले आहेत. काही वेळा तरमिनाक्षी शिंदे यांनी कठोर निर्णय घेऊन प्रशासनाला अंगावर देखील घेतले आहे. दरम्यानविधानसभा निवडणुकीच्या महापौर शिंदे यांना गुंड तसेच गँगस्टर यांच्या नावाने फोन आल्यानेठाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.