• MyPassion
ठाण्याच्या अपूर्वाने पटकावले इंग्लंड मधील चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदक .  
02 Oct, 2019

अपूर्वा पाटील ही ठाणे जिल्ह्यातील पहिली आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू ठरली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय  चॅम्पियन स्पर्धेमध्ये ठाण्याच्या अपूर्वा पाटीलने सुवर्णपद पटकावले आहे . कॅडेट वयोगटात खुल्या वजनि गटामध्ये सहभागी होताना अपूर्वा ने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेचा समारोप दिनांक 29/09/2019  रोजी झाला. स्पर्धेत सुमारे 20 देशांचा सहभाग होता. भारत, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, जमैका अशा देशातील खेळाडूंमध्ये ह्या स्पर्धेची सुरवात झाली. अपूर्वाने एकूण सात सामने पार पाडत आंतरराष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत विजय मिळवला . अपूर्वाने आजवर विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके पटकाविले होते .  यापूर्वी ती दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेली आहे.  ती तिच्या जु-दोचा सराव तिचे प्रशिक्षक श्री देवीसिंग राजपूत,  सहशिक्षक श्री भूपेंद्र सिंग राजपूत व साहिल मेंडन यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती क्रीडा संकुल ठाणे येथे वयाच्या 08 व्या वर्षा पासून करीत आहे.  अपूर्वा सोमय्या कॉलेजमध्ये 12 वि चे शिक्षण घेत असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे