• MyPassion
ठाण्याचा हितेश ठरला न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा आयर्नमॅन
13 Mar, 2019

ठाण्यातला हितेश मल्होत्रा याने न्यूझीलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायलॉंन स्पर्धेत आयर्नमॅन हा मानाचा पुरस्कार मिळवला.२ मार्च २०१९ रोजी न्यूझीलंडच्या ताऊपो येथे स्पर्धा झाली.या स्पर्धेत ३.८ कि.मी. स्विमिंग,१८० कि.मी. सायकलिंग आणि ४२.२ कि.मी.मॅरेथॉन सतरा तासात पूर्ण केली.हितेश याने हि स्पर्धा १६ तास १४ मिनिटात पूर्ण केली.या स्पर्धेसाठी १४०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.सकाळी सात वाजता सुरु झालेली स्पर्धा न थांबता पूर्ण करावी लागते. या स्पर्धेसाठी हितेश याने तीन वर्षात असलेले ११३ किलो वजन ८१ किलो इतके कमीकेले.भारतात हि स्पर्धा गोवा येथे ऑक्टेम्बर २०१९ मध्ये होणार असून त्यामध्ये देखील हितेश भाग घेणार आहे. हितेशने आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणे हे आमच्या कुटुंबासाठी कौतुकाची बाब असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी दिली.