• MyPassion
ठाणे स्थानका जवळील  वन रूपी क्लिनिकमध्ये बसविण्यात आली स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्रणा.
19 Sep, 2019

रेल्वे प्रवाशांना हाकेच्या अंतरावर वैद्यकीय सुविधादेण्यासाठी स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या ठाण्यातील वन रूपी क्लिनिकमध्ये स्वयंचलितरक्तदाब तपासणी यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा सुरू करणारे ठाणे हे मुंबईतीलपहिले रेल्वे स्थानक असून आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंत्रणेचे उद्घाटनबुधवारी दुपारी करण्यात आले.रेल्वे प्रवासादरम्यान वाढत्या गर्दीतप्रवाशांना आरोग्याच्या तक्रारीही जाणवितात. अशावेळी तातडीने त्यांना वैद्यकीय सेवादेणाऱ्या वन रूपी क्लिनिकमध्ये स्वयंचलित पद्धतीने रक्तदाब करण्याची सुविधा उपलब्धकरून देण्यात आली आहे. यापूर्वी अत्यल्प दरात रक्तचाचणी केली जात असली तरी आता विनामूल्यरक्तदाब तपासणी प्रवाशांना करता येणार आहे. लहान वयातच रक्तदाबाची चिंता भेडसावत असतानागर्दीच्या वेळी प्रवासात अनेकांची प्रकृती बिघडते. त्यामुळे रक्तदाबाची चाचणी योग्यवेळी करणे गरजेचे असते. स्वयंचलित यंत्रणेत उजवा हात दंडापर्यंत मशीनमध्ये टाकून स्टार्टबटण दाबल्यानंतर प्रक्रिया सुरु होते. त्यानंतर रक्तदाब तपासणी पूर्ण झाल्यानंतर रक्तदाबनोंदणीची प्रिंट मशीनमधून येते. अवघ्या काही सेकंदामध्ये ही तपासणी होत असून त्याचीपावतीही घेता येते. उद्घाटनावेळी खासदार राजन विचारे, वन रूपी क्लिनिकचे डॉ. राहुलघुले आदी उपस्थित होते.