• MyPassion
ठाणे शहरातील जैवविविधततेचा ठेवा जतन कराण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा पुढाकार .
07 Jun, 2019

ठाणे शहरातील जैवविविधततेचा ठेवा जतन करावा तसेच त्यांचे चांगल्याप्रकारे संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या शास्त्रोक्तपद्धतीने उपाययोजना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका पुढाकार घेणार असल्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. गुरुवारी राज्य वन संरक्षण समितीचे सदस्य किरण शेलार यांच्यासह प्रदीप पाताडे, भाऊ काटदरे, डॉ. दिनेश विनेरकर, निकित सुर्वे आदी तंज्ञांसोबतच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, या बैठकीला अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने ठाणे शहरता असलेल्या जैवविविधतची माहिती घेणे, त्या माहितीची व्यवस्थित मांडणी करणे आणि त्या नंतर त्यांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक ती उपायोजना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा ठेवा कसा वृद्धींगत करता येईल यावर चर्चा झाली. त्याचबरोबर जयस्वाल यांनी जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी या सर्व तज्ञांना कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतात याचा अहवाल सादर करुन त्यानंतरची कार्यवाही निश्चित करता येईल, असे स्पष्ट केले,