• MyPassion
ठाणे महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचं आयोजन.
21 Aug, 2019

ठाणे महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. महापौर मिनाक्षी शिंदे यांनी ही माहिती दिली. ही स्पर्धा उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्तीकार आणि स्वच्छता अशा तीन गटात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना १० हजार, साडेसात हजार आणि साडेतीन हजार असं पारितोषिक देऊन गौरवलं जाणार आहे. उत्कृष्ट मूर्ती आणि स्वच्छता या गटांना वेगळे पुरस्कार दिले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-या मंडळांनी आपले अर्ज २८ ऑगस्ट पर्यंत सादर करावेत असं आवाहन महापौरांनी केलं आहे.