• MyPassion
ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदार संघातून ३०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
05 Oct, 2019

निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातून एकूण ३७२ उमेवारांनी निवडणुकीसाठीउमेदवारी अर्ज दाखल केले असून एकूण ३०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्येसर्वाधिक उमेदवार हे कल्याण (पश्चिम ) आणि उल्हासनगर मतदार संघात आहेत . कल्याण (पश्चिम)मध्ये ३२ उमेदवार तर उल्हासनगरमध्ये तेवढेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत . त्याखालोखालभिवंडी (पश्चिम) मध्ये २५ तर अंबरनाथ विधान सभा क्षेत्रात २३ उमेदवारांनी आपला उमेदवारीअर्ज दाखल केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात येत आलेल्या चार विधानसभा क्षेत्राकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले आहे . ठाणे विधानसभा क्षेत्रात भाजप विरोधात मनसे असा सामनाहोणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यात हासामना रंगणार आहे .  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीमतदार संघात काँग्रेसच्या घाडीगावकर यांनी आव्हाड दिले आहे . मनसेने देखील या मतदारसंघात उमेवारी अर्ज दाखल केला आहे . ओवळा-माजिवडा मध्ये प्रताप सरनाईक यांच्या समोरकोणताही तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांचा विजय निश्चित मनाला जात आहे .  कळवा -मुंब्रा विधानसभा क्षेत्रात मात्र शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिमकार्ड चालवले असून मराठी सिनेसृष्टीला अभिनेत्री दीपाली सैयद हिला या मतदार संघात उतरवूनही निवडणूक अधिक रंगतदार केली आहे .