• MyPassion
ठाणे गुन्हे शाखेने २० वर्षीय तरुणाला अटक  करून हस्तगत केला ६ किलो गांजा
09 Oct, 2019

एन निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे गुन्हे शाखेने एका २० वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून ६ किलो गांजा हस्तगत केला आहे . ५ ऑकटोबरला शीळ- डायघर परिसरातून या तरुणाला अटक करण्यात आली आहे . अभिषेक भोसले असे अटक झालेल्या तरुणांचे नाव आहे .  ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ ला दोन व्यक्तींकडे जवळपास ३६ किलो गांजा असून ते मुंब्रा पनवेल रोडवरील एका बारमध्ये घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या आधारे या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. मात्र या ठिकाणी दोन व्यक्ती ऐवजी केवळ अभिषेक भोसले हाच तरुण आढळून आल्याने पोलिसांनी केवळ अभिषेकलाच अटक केली.  युनिट १ च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार,मुंब्रा पनवेल रोडवरील सुनील बारच्या विरुद्ध दिशेला दोन जण ३० ते ३५ किलो गांजा घेऊन येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती.  त्यामुळे या ठिकाणी ५ ऑकटोबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान सापळा रचण्यात आला . मात्र दोन प्रत्यक्षात दोन व्यक्ती न येता केवळ अभिषेक भोसलेच या ठिकाणी सापडला. त्यामुळे पोलिसांनी अभिषेकलाच ट्रॅप केले. अभिषेककडे असलेल्या काळ्या बॅगेत जवळपास ६ किलो गांजा तसेच ७२ हजार रुपयांची कॅश देखील सापडली आहे . भोसले हा कोल्हापूरचा राहणारा असून त्याने बेकायदेशीर या ठिकाणी गांजा विकणासाठी आणला होता. अँटी नार्कोटिक्स कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे .