• MyPassion
तलावांच्या शहरातील तलावच ठरलेत मृत्यूचे सापळे .
07 Jan, 2020

ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते परंतु आता हेच तलाव मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत . ठाण्यातील ब्रह्माड परिसरातील तुर्भे तलावांमध्ये गेल्या दोन वर्षात जवळपास पंचवीस ते तीस जणांचा बुडून मृत्यू झाला आहे ,त्यामुळे या तलावांची ओळख मृत्यूचे तलाव अशी होत आहे . त्यामुळेच तेथील स्थानिक नागरिक त्रस्त आहेत . ठाणे शहराची ओळख हि तलावांचे शहर म्हणून आहे . जवळपास ठाण्यामध्ये सत्तर तलाव होते परंतु वाढता विकास आणि कॉंक्रीटीकरण यामुळे फक्त तीस तलावचं वाचली आहेत,. हे तलाव आनंद देण्याचं व मन प्रसन्न करण्याचा काम करत आहेत परंतु काही तलाव याच्या विरुद्ध म्हणजेच मृत्यूचा सापळा बनले आहेत . याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील ब्रह्मांड परिसरातील तुर्भे तलाव हा मृत्यूचा सापळा बनला आहे . याठिकाणी असलेल्या गैरसोयींमुळे अनेकांचे जीव गेले आहेत या तलावात मुले पोहण्यासाठी येतात आणि आपला जीव गमावतात. याठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याची खंत येथील स्थानिक नागरिक व्यक्त करतात.