• MyPassion
श्री मा बालनिकेतन शाळेत रजत महोत्सवानिमित्त भव्य स्वरूपात शालेय स्पर्धांचे आयोजन-
08 Dec, 2017

श्री मा ट्रस्ट संचालित बालनिकेतन हायस्कूलच्या आंतरशालेय स्पर्धाना २५ वर्ष पूर्ण झाल्याने आज ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्री बालनिकेतन हायस्कूल, आनंदनगर, कोपरी , ठाणे या ठिकाणी रजत महोत्सव शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन श्री माँ ट्रस्टचे विश्वस्त , चेअरमन श्री बालगोपाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तीन दिवसीय चालणाऱ्या या स्पर्धेला श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संपर्क अधिकारी आणि ट्रस्टचे विश्वस्त मिस मंजू तेजवानी सेक्रेटरी रमेश जोशी, शाळेच्या मुख्याध्यपिका जयश्री गोपाळ कृष्णन,मीनाक्षी अय्यर, तसेच अनेक शाळांच्या मुख्याद्यापकांनी या महोत्सवाला हजेरी लावली.या महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणे या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर, फेब्रिक पैंटिंग, काव्यपठाण, कथाकथन, इंग्रजी ,मराठी,हिंदी वक्तृत्व चित्रकला, पुष्परचना, गायन रांगोळी , यांसारख्या, विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयांची सांगड घालण्यात आली होती. या स्पर्धेत भाग घेतलेल्या विजयी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस आणि प्रशस्तिपत्रके, देण्यात आली.