• MyPassion
शिवसेनेचा नगरसेवक लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात.
07 May, 2019

काशिमिरा भागातील शिवसेनेचे नगरसेवक कमलेश भोईर याना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यस्तासह अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये, म्हणून १० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. तक्रारदाराने सोमवारी रात्री १० हजार रुपये मध्यस्थ असलेला ठेकेदार गोरखनाथ शर्मा याच्याकडे दिल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली. मिरा रोड पालिकेच्या मुंशी कंपाऊंडमधील एका घराची बेकायदा उंची वाढविण्याच्या कामाची तक्रार करु नये म्हणून तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात अखेर १० हजार रुपयांवर तडजोड झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा आडनाईक यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.