• MyPassion
शरद पवार यांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल .
03 Oct, 2019

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे 149 कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजसेवक कन्हैया कुमार, पुरोगामी विचारांच्या सुषमा अंधारे या दिग्गजांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार यांनी तब्बल 3 तास भरउन्हात आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्तीत राहून चाहत्यांचे मन जिंकले. यावेळी महाआघाडीच्या पक्षांचे हजारो कार्यकर्ते, जनसमुदाय, जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्यासाठी मुंब्र्यात रस्त्यावर उतरला होता. कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकाना अजून उमेदवार मिळेना अशी परिस्थिती असताना आजच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना आजच्या रॅलीला जणू विजयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शरद पवार हे आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिल्याने आव्हाड भावुक झाले. ऐका बापाने आपल्या पोरासाठी जे कराव ते पवार साहेबांनी माझ्यासाठी केले असल्याची भावना यावेळी आव्हाडांनी वक्त केली. माझ्यासारख्याछोट्या कार्यकर्त्यांसाठी वयाच्या ८० व्या वर्षी काय काय करतो हा माणुस हे अख्या महाराष्ट्राला कळले असून ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना मागच्या दोन महिन्यात जो काय त्रास दिलाय त्यांना हि जनता माफ करणार नाही असे म्हणत अर्ज दाखल करताना जितेंद्र आव्हाड यांचे अश्रू अनावर झाले.ईडीच्या प्रकरणानंतरराष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.हा केवळ माझाएकट्याचा प्रश्न नसून विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा वापरकरण्यात येत असून ईडीच्या या प्रेमप्रकरणांनंतर लोकांचा प्रतिसाद वाढला असून यावेळीपरिवर्तन होणार असा विश्वास शरद पवार यांनी ठाण्यात व्यक्त केला आहे.राजकारणात कोणालाकुठेही जाण्याचा अधिकार असून मतदार मात्र त्यांचा योग्य अधिकार बाजावतील असा टोला देखीलपवारांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या गयारामाना लगावला आहे.