• MyPassion
संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे होणार दहीहंडी उत्सव साजरा.
21 Aug, 2019

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे येत्या शनिवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदा कर्करोगाबद्दल जनजागृतीचा संदेश देण्यासाठी प्रो गोविंदा २०१९चं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या दहीहंडी उत्सवाचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. त्याचबरोबर कोल्हापूर येथील पूरामध्ये पूरग्रस्त झालेलं मजरेवाडी गाव दत्तक घेण्यात आलं असून या गावाला मदत देण्याचं आवाहन दहीहंडी उत्सवात केलं जाणार आहे. प्रो गोविंदा २०१९ मध्ये मुंबईतील ७ तर शहरातील ३ गोविंदा पथकं सहभागी होणार आहेत. प्रो गोविंदा २०१९ दिवसभर साजरा होणार असला तरी स्पर्धा मात्र संध्याकाळी ६ ते १० या वेळेत होणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या दहीहंडी उत्सवातून जमा होणा-या निधीतून मजरेवाडी गावातील ग्रामस्थांना संसारोपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत.