• MyPassion
सखल भागामध्ये पाणी साचण्याच्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याच्या आयुक्तांच्या सूचना.
03 Jul, 2019

अतिवृष्टीच्या काळात ज्या सखल भागामध्ये पाणी साचते त्या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून स्थानिक नगरसेवकांना विश्वासत घेण्याच्या सूचना देतानाचमहापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याबाबत 8 तारखेपर्यत अहवाल सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. दरम्यान अतिवृष्टीच्या काळात सार्वजनिक विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, नाले आणि मलःनिस्सारण विभागाने तीन पाळ्यांमध्ये 24 तास कार्यरत राहण्याच्या सूचनाही श्री. जयस्वाल यांनी दिल्या आहेत. गेले तीन दिवस ठाणे शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या वृक्ष पडण्याच्या तसेच शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेवून या काळात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेतला. या बैठकीत त्यांनी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या समस्येच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला आणि या ठिकाणी या कालावधीमध्ये काही तातडीची कामे करावयाची असलयास ती करावीत अशा सूचना दिल्या. मात्र या ठिकाणी कायमस्वरुपी काय तोडगा निघू शकेल याचा अभ्यास करुन नगर अभियंत्याने 8 जुलैपर्यत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. याबाबतकार्यकारी अभियंता उपअभियंता यांनी स्थानिक नगरसेवकांना विश्वासत घेवून त्यांच्या सूचनांचा प्राधान्याने अंतर्भाव करावा असे सांगितले. दरम्यान सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांनी पुन्हा नव्याने स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रभाग समितीमध्ये फिरून पाहणीकरावी जेणेकरुन भविष्यात कुठलीही दुर्घटना घडणार नाही असे श्री. जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.