• MyPassion
राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना उठसूट कमळ दिसते - सहकार पणनमंत्र्यांचा टोला.
13 May, 2019

संताजी-धनाजीप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उठसूठ कमळ दिसू लागले आहे, असे टोला सहकार पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ठाण्यात लगावला. ज्या ठिकाणी पवार यांनी मतदान केले तेथे कमळ हे चिन्ह नव्हते, असा माझा दावा असल्याचे त्यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केला. येत्या १७ मे १९मे दरम्यान ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड ग्राउंड सोलापूर महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी देशमुख हे ठाण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पवार हे गेली ५० वर्षे राजकारणात आहेत, त्यांना राजकारणातील सर्व गोष्टी न्यात आहेत.आता त्यांना विजय आणि पराजयाची चाहुल लागली असून पराभवाला सामोरे जाताना मशीन खराब आहे असे सांगून बटन दाबले तर कमळाला मत जाते, ते सांगत आहेत. पराभवाची पार्श्वभूमी ते तयार करत असावे,असेही देशमुख म्हणाले. दुष्काळाला समोरे जाताना,पाणी,चारा आणि रोजगार हे तीन विषय महत्त्वाचे आहेत. त्यातच दुष्काळ निधी हा पोहोचला आहे. काही ठिकाणी खाते नंबर चुकीचे दिले गेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी खाते नंबर अचुक द्यावेत असे आवाहन ही त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला सोलापूर सोशल फाउंडेशनचे अभिजीत पाटील, इंद्रजीत निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर,भूषण कुलकर्णी आदी उपस्थित होते.