• MyPassion
क्वेट्टा शहरातील चर्चवर आत्मघातकी हल्ला
18 Dec, 2017

नाताळ सणाला एक आठवडा बाकी असताना क्वेट्टा शहरातील बेथेल मेमोरियल चर्चला आत्मघातकी हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. ​या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, त​​र ४४ जण जखमी झाले आहेत. यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहरात हे चर्च आहे. दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक हल्लेखोर ठार झाला आहे. तर दुसरा बॉम्बस्फोटात मारला गेला आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.