• MyPassion
पूरग्रस्तांसाठी आहेर ऑटॉप्राइमतर्फे २ लाख ५१ हजारांची मुख्यमंत्री निधी साठी मदत .
20 Aug, 2019

पूरग्रस्तांसाठी आहेर ऑटॉप्राइमतर्फे २ लाख ५१ हजारांची मुख्यमंत्री निधी साठी मदत कल्याण : कोल्हापूर, सांगली व लगतच्या भागातील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आहेर ऑटॉप्राइम कल्याणच्या संपूर्ण कर्मचारीवर्गाने एका दिवसाच्या वेतनाचे योगदान ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी साठी मदत म्हणून दिले आहे. कोल्हापूर सांगली या भागात पूरपरिस्थितीनंतर नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून हे नुकसान भरून काढण्यासाठी सर्वच स्तरातून त्यांना मदत केली जात आहे. समाजाप्रती आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेतून कल्याणच्या आहेर ऑटॉप्राइमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले आहे. यामध्ये या कर्मचाऱ्यांचे वेतन १ लाख तसेच संस्थेच्या मालकांच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजार असे एकूण दोन लाख एक्कावन्न हजारांचा धनादेश कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडे देण्यात आला. आहेर ऑटॉप्राइमच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मदत म्हणून पूरग्रस्तांना दिला असून सांगली कोल्हापूर याठिकाणी झालेल्या हानीतून येथील नागरिकांनी लवकरात लवकर सावरावे अशी भावना आहेर ऑटॉप्राइमचे जनरल मॅनेजर स्वप्नील भवसार यांनी व्यक्त केली. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वप्रथम आमच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. कर्माचारयांनी हि संकल्पना व्यवस्थापना समोर मांडल्यानंतर आम्ही देखील त्याला संमती दर्शवित व्यवस्थापनाच्या वतीने देखील मदत केली असून अशाप्रकारे शासनाला जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही नक्की करू अशी प्रतिक्रिया आहेर ऑटॉप्राइमचे एच.ओ.डी. सोमेन घोष यांनी दिली. तर सामजिक बांधिलकी, समाजाप्रती आपले असलेले ऋण फेडण्याच्या दृष्टीने या भावनेतून केलेल्या मदतीबद्दल शासनाच्या वतीने आभार मानत असून हि मदत केवळ पूरग्रस्तांना मदत नसून या मदतीद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांची एकता, सात्विकता कल्याणकरांना आणि प्रशासनाला दिसल्याचे तहसीलदार दिपक आकडे यांनी सांगितले.