• MyPassion
पुन्हा एकदा पालिकेच्या गळथान कारभारामुळे गॅसवाहिनी फुटली.
13 Jun, 2019

ठाण्यात महानगर गॅसची वाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच आहे.रविवारी ठाण्यातील कोरम मॉल येथे गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बुधवारी सायंकाळी गोकुळनगर येथे रस्ता खोदकाम करताना गॅस वाहिनी फुटली.सुदैवाने,तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहचल्याने दुर्घटना टळली.दरम्यान,गॅसवाहिनी फुटल्याने काही काळ घबराट पसरून वाहतुक इतरत्र वळवावी लागली होती.या परिसरात असलेल्या एका बड्या हॉटेलमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भूमिगत केबलच्या दुरुस्तीसाठी रस्ता खोदकाम करण्याचे काम सुरु असतानाच ही गॅसवाहिनी बाधित झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.