• MyPassion
प्लास्टीक कचरा निर्मुलनाच्या जनजागृतीपर करण्यात आले बाईक रॅलीचे  आयोजन. 
02 Oct, 2019

नागरिकांनी फक्त एकदाच वापरात आणून फेकल्या जाणाऱ्या प्लास्टीकचा वापर बंद करून प्लास्टीक कचरा निर्मुलनाच्या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे याकरिता जनजागृतीपर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून आज 2 ऑक्टोबर  सकाळी महापालिका भवन येथून या बाईक रॅलीला  सुरुवात करण्यात आलीस्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने केंद्र सरकारमार्फत ११ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणाऱ्या 'स्वच्छता ही सेवा'  या उपक्रमांतर्गत संपूर्ण शहरभर स्वच्छतेचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्लास्टिक प्रतिबंधावर विशेष भर दिला जात असून शालेय विद्यार्थ्यांपासून ते स्वयंसेवी संस्थांपर्यंत प्रत्येकाला या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.  ठाणे महानगरपालिकेच्या  माध्यमातून शहराच्या वेगवेगळ्या भागांत स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. या मोहिमेत शहरातील स्वयंसेवी संस्था, कंपन्या यांचा सहभाग असून, त्यांच्यामार्फत  प्लास्टिक बंदीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. प्लस्टिक वापर बंदीबाबतच्या प्रसारासाठी शहरातील विविध ठिकाणांवरुन  सर्व प्रभाग समितीमधील सर्व झोपटपट्टी भागामध्ये ही बाईक रॅली काढण्यात आली  रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक बऱ्याच वेळा जनावरे,पाळीव प्राणी खातात याला आळा घालण्यासाठी शहरातील प्राणी प्रेमी आपल्या पाळीव कुत्र्यांसोबत प्लास्टिक वापर रोखण्यासाठीचा संदेश देण्यासाठी या रॅलीत सहभागी झाले होते .