• MyPassion
ओवळा माजिवडा मतदार संघातील विभागीय निवडणूक कार्यालयात प्लास्टिकचा वापर केल्यास होणार कारवाई .
09 Oct, 2019

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियांनतर्गत ओवळा माजिवाडा निवडणूक कार्यालयात मंगळपासून प्लास्टिक मुक्त उपक्रम राबविले जाणार आहेत. या विधानसभा मतदारसंघातून एकूण १४ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.निवडणुकीच्या कामकाजासाठी येणाऱ्यांकडे जर प्लास्टिक आढळल्यास त्यांना दंडही करण्यात येणार आहे. या उपक्रमाला सुरुवात करण्याआधी कार्यालाची साफसफाई करताना तीन किलोहून अधिक प्लास्टिक जमा करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्त अभियानाला हातभार लावत 'ग्रीन कार्यालय' करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघातून १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन अर्ज अपात्र ठरले. एकूण १४ उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. यंदाच्या या निवडणुकीमध्ये एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विभागीय निवडणूक कार्यालयात यापुढे कोणी जाणीवपूर्वक प्लास्टिकचा वापर केल्यास त्यांना नियमाप्रमाणे जी कारवाई असेल त्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ओवळा-माजिवडा विभागीय निवडणूक कार्यालय प्लास्टिक मुक्त कार्यालय म्हणून घोषित करण्यात आले असून या कार्यालयात काम करत असलेले कर्मचारी,बाहेरून येणारे विजीटर,  उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच जे जे या निवडणूक कार्यालयात येणार आहेत त्या सर्वाना प्लास्टिक वापरता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे . अशाप्रकारचे प्लास्टिकमुक्त निवडणूक कार्यालयात हे राज्यातील पहिले निवडणूक कार्यालय असावे असा दावा या निवडणूक कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.   देशात प्लास्टिक मुक्तीची घोषणा करण्यात आली असली तरी सर्वच ठिकाणी त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होतात दिसत नाही. अनेक ठिकाणी आजही प्लास्टिकचा वापर काही प्रमाणात होताना दिसतो. मात्र प्लास्टिक मुक्तीचा निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर ओवळा माजिवडा निवडणूक कार्यालय प्लास्टिक मुक्त कार्यालय करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बगल यांनी जाहीर केला आहे . या निर्णयानुसार या कार्यालयात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लस्टिक वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.    या मतदार संघात एकूण १६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते . यापैकी दोन उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले असून आता निवडणुकीच्या रिंगणात केवळ १४ उमेदवार आहेत . निवडणुकीचे काम संभाळण्यासाठी या निवडणूक कार्यालयात ३०० कर्मचारी कामाला असून दररोज मोठ्या प्रमाणात विजीटर देखील येत असल्याने या सर्वांकडून प्लास्टिकचा वापर होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात येणार असल्याचे बगल यांनी स्पष्ट केले आहे .  या मतदार संघात ८८६ दिव्यांग मतदारांची  नोंद झाली असून ही प्रक्रिया अजूनही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे . बहुतांश सर्व मतदार संघ हे पहिल्या मजल्यावर तसेच तळ मजल्यावर असून सर्वच ठिकाणी लिफ्टची सुविधा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले . आतापर्यंत आदर्श आचार संहितेच्या अंतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून ते मीरा-भाईंदरच्या हाद्दीतले आहेत . मात्र याचा उमेदवारांशी संबंध नसल्याचे या कार्यायच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे . निवडणुकीची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली असल्याचेची बागल यांनी स्पष्ट केले आहे .