• MyPassion
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या शाईमुळे अधिकाऱ्यांच्या हाताला इजा.
06 May, 2019

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतील मतदान केल्याची खूण म्हणून वापरण्यात आलेल्या शाईमुळे दोघी मतदान अधिकाऱ्यांच्या हाताला इजा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या शाईच्या ऍलर्जीमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांची बोटे सुजली असून त्यांच्या हाताची त्वचाही जळून गेली आहे. मतदान केल्याचा पुरावा म्हणून प्रत्येक मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटाला काळ्या रंगाची शाई लावण्यात येते.मतदान केंद्रात एका कर्मचाऱ्याची या कामासाठी नियुक्ती करण्यात येते.मात्र या घातक शाईमुळे इजा झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत.दीपा ठाणेकर आणि राजश्री विरणक या दोघी पोलिंग ऑफिसरच्या हाताची बोटे सुजली असून हाताची त्वचाही जळून सालटी निघत आहेत.असह्य वेदनामुळे या महिलांना घरातील स्वयंपाकदेखील करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर शाई ठेवलेली बाटली छोटी व निमुळती असल्याने शाई हाताला लागून इन्फेक्शन वाढले.अशा प्रकारच्या अनेक तक्रारी निवडणूक कर्मचाऱ्यांनी केल्या.तेव्हा, मतदानाच्या शाईची गुणवत्ता तपासणे गरजेचे असून प्रशासनानेही मतदान प्रक्रियेसाठी उच्च प्रतीच्या वस्तू पुरवाव्यात.अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.