• MyPassion
नोटीसा बजावून पालिकेने रुग्णालयांवर कारवाई केल्याने डॉक्टरांनी घेतला धसका.
13 May, 2019

ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव, इमारतींना ओसी,सीसी नसल्याच्या कारणास्तव पालिका प्रशासनाने नोटिसा बजावून ४८ तासात पालिका हद्दीतील १५ रुग्णालयांना सील करण्याची कारवाई केल्याने खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी धसका घेतला आहे. अशा प्रकारची तत्काळ कारवाई केल्याने किमान नर्सिंग होम कायद्यानुसार एक महिन्याची नोटीस बजावणे अपेक्षित होते. खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर आता न्यायालयात सोमवारी दाद मागणार आल्याची माहिती पत्रकार परिषदेत डॉ. पांडे यांनी सांगितले. दरम्यान पालिका प्रशासनाने नोटीस बजावून ४८ तासात रुग्णालयातील रुग्णांना अन्यत्र हलवून रुग्णालये सील करण्याची कारवाई केली हि जाचक कारवाई करण्यात आल्याने डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचिकेवर सुनावणी करताना न्यायलयाने डॉक्टरांची बाजुच एकली नाही. ती बाजू मांडण्यासाठी आम्ही न्यायलयात सोमवारी दाद मागणार असल्याचे पत्रकार परिषदेत उपस्थित डॉक्टरांनी सांगितले.