• MyPassion
निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा इशारा .
02 Oct, 2019

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले जे कर्मचारी प्रशिक्षणासाठी गैरहजर राहतील अशा कर्मचा-यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांना प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांचं पहिलं प्रशिक्षण सुरू झालं आहे. या प्रशिक्षणास अनेक कर्मचारी गैरहजर होते. विधानसभा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. या राष्ट्रीय कार्यात प्रामाणिक काम करणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य असून त्यामुळे या कामासाठी कर्मचारी वर्गानं गैरहजर न राहता उत्स्फुर्तपणे काम करावं असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. जिल्ह्यामध्ये आवश्यक त्यापेक्षा ६ टक्के मनुष्यबळाची कमतरता आहे. पण असं असलं तरी पुरेशा मनुष्यबळाची उपलब्धता करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.