• MyPassion
न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरजवळ स्फोट
12 Dec, 2017

​न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरजवळ एक जबरदस्त स्फोट झाला होता. मॅनहॅटन येथील एका बस स्टँडमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समजली. हा दहशतवादी हल्ला आहे, की आणखी काही प्रकार, यासंदर्भात अद्याप खुलासा झालेला नाही. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून तो बांगलादेशी वंशाचा आहे. सध्या पोलीस या स्फोटाचा तपास करत आहेत. परिसरातील ट्रॅफिकदेखील पोलिसांनी बंद केली आहे. हा स्फोट सोमवारी ​तेथील वेळेनुसार ​सकाळी झला.