• MyPassion
नासाने शोधली नवी सूर्यमाला
15 Dec, 2017

अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेला नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. या सूर्यमालेत ‘केप्लर ९०’ नावाच्या ताऱ्याभोवती चारही बाजूने ग्रह फिरताना दिसत आहेत, असे नासाकडून सांगण्यात आलं आहे. केप्लर स्पेस टेलिस्कोपद्वारे या नव्या सूर्यमालेचा शोध लावण्यात आला असून त्यात आठ ग्रह आहेत. याचा व्हिडिओ 'नासा'ने ट्विट केला आहे. आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह फिरतात. त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही एका ताऱ्याभोवती ग्रह फिरत आहेत. या नव्या सूर्यमालेत ‘केप्लर ९०’ नावाच्या ताऱ्याभोवती चारही बाजूने इतर ग्रह फिरताना दिसत आहेत, असे नासाने सांगितले.