• MyPassion
नागरिकांनी पालिकेच्या टोल फ्री सुविधेचा वापर करण्याचे महापौरांचे आवाहन.
19 Mar, 2020

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्याचे काम ठाणे महानगरपालिकेने प्रभावीपणे हाती घेतले असून या आजाराचा सामना करण्यासाठी  महापालिका सज्ज झाली आहे. एखाद्या विभागात संशयित व्यक्ती आढळून आल्‌यास याबाबत  महापालिकेच्या आरोग्य विभागातील 022 25332685 किंवा  प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष टोल फ्री 1800 222 108 / 022 25371010 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा. नागरिकांनी या आजाराबाबत घाबरु न जाता सतर्क रहावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.           महापालिका कार्यक्षेत्रात  प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. सद्य स्थीतीमध्ये काही व्यक्तीमध्ये ताप, सर्दी, खोकला  सारखे आजार दिसून येतात. काही व्यक्ती याकडे दुर्लक्ष करीत असून औषधोपचार करण्यास टाळाटाळ करीत आहे. सदरील बाब  अतिशय गंभीर असून दुर्देवाने  हा आजार बळावून अनर्थ घडू नये यासाठीच सर्वांनी दक्ष राहून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किंबहुना अशा प्रकारची व्यक्ती आढळून आल्यास याबाबतची माहिती तात्काळ महापालिकेने उपलबध केलेल्या टोल फ्री कमांकावर द्यावी.  याबाबत तातडीने दखल घेवून महापालिकेचे अधिकारी संबंधीत व्यक्तीच्या घरी जावून त्याची माहिती घेवून त्यास योग्य मार्गदर्शन करतील व आवश्यकता भासल्यास महापालिकेच्या रुगणालयात विलगीकरण कक्षात दाखल करुन पुढील उपाययोजना करण्यात येईल. अशा  व्यक्तींची माहिती उपलब्ध करुन देणाऱ्या व्यक्तीबाबत पूर्णपणे गोपनीयता राखली जाईल असेही महापौरांनी नमूद केले.           तरी या आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे