• MyPassion
मुंब्र्यात अनधिकृत बांधकामांवर पालिकेची धडक कारवाई .
11 Jun, 2019

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत बॉम्बे कॉलनी येथील अनधिकृत बांधकामावर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अनधिकृतपणे करण्यात आलेले वाढीव बांधकाम संपूर्णपणे तोडण्यात आले. ही कारवाई मुंब्र्याचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अमित गडकरी, जितेंद्र साबळे यांनी पोलीस बंदोबस्तात केली. मुंब्रा येथील बॉम्बे आरे कॉलनीमधील इस्माईल मंझील वरील आठ फ्लॅटचे नव्याने झालेले आरसीसी वाढीव अनधिकृत बांधकाम संपूर्णपणे तोडण्यात आले. मुंब्रा परिसरातील अनधिकृत बांधकाम व धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याची मोहिम आजपासून हाती घेण्यात आली आहे. रमझान सणाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱी हे ट्रॅफिकमुक्त रस्ते करुन देण्यात व्यस्त होते. याकाळात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली असून या बांधकामावर कारवाई करण्याची मोहिम महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असल्याचे मुंब्र्याचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी सांगितले.