• MyPassion
मुंब्रा येथे लागलेल्या भीषण आगीत सात गोदामे जळून खाक. 
07 Jan, 2020

शिळफाटाजवळील खान कंपाऊंड येथील सात गोदामांना भीषण आग लागली. रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण आगीत सातही गोदामे जळून खाक झाली आहेत.खान कंपाऊंडमध्ये काही गोदामे आहेत. या गोदामांना आग लागली. आगीचे नेमके कारण समजले नाही. आग भीषण असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्न करावे लागले. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार वॉटर टँकर व दोन जंबो वॉटर टँकर, दोन रेस्क्यू व्हॅन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.