• MyPassion
​‘एअरसेल’ मोबाइल सेवा ​​जानेवारीपासून ​बंद
22 Dec, 2017

एअरसेलतर्फे पुढील महिन्यात ३० जानेवारीपासून मोबाइल सेवा बंद करण्यात येणार आहे. कंपनीतर्फे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील सेवा बंद करण्यात येणार आहे. ग्राहकांची अडचण होऊ नये, यासाठी कंपनीने क्रमांक पोर्ट करण्यासाठी मदत करावी, असे आदेश ‘ट्राय’ने दिले आहेत. एअरसेल लिमिटेड आणि डिशनेट वायरलेस लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी आपले परवाने परत केल्याची माहिती ट्रायने दिली. कंपनीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील परवानेही परत केले आहेत.