• MyPassion
मतदान केंद्रावर मतदारांनी मोबाईल न वापरण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन .
19 Oct, 2019

विधानसभा  सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा क्षेत्रात सोमवार दि. 21 /10 /2019 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजे पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी (Polling Agents) यांना मोबाईल फोन, कॅमेरा, ईलेक्ट्रॉनिक वस्तू / गॅझेट यांच्या वापर करण्यास भारत निवडणूक आयोगाने सक्त मनाई केली असल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांनी मोबाईल वापरु नये,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे. निवडणूकीसाठी मतदान करण्यासाठी मतदाराकडे मतदार छायाचित्रओळखपत्र आवश्यक असून तो नसल्यास खालीलपैकी कोणतेही एक दस्ताऐवज हे ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.