• MyPassion
मत मिळवण्यासाठी काही पक्ष शिवाजी महाराजांचे नाव वापरतात - मराठा समाजाच्या नेत्यांच्या आरोप .
20 Aug, 2019

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर फक्त राजकारण करणा-या राजकीय पक्षांना महाराजांच्या पुतळ्यांचे त्यांच्या विचारांचे काहीच पडले नसून फक्त मत मिळवण्याकरता काही पक्ष महाराजांचे नाव वापरतात असा घणाघाती आरोप करत आज मराठा समाजाच्या नेत्यांनी ठाणे महानगरपालिकेत जाऊन जोरदार हंगामा केला आणि शिवसेना महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या सह अनेक शिवसेना नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय ... पालिका मुख्यालयात शिवाजी महाराजांच शिल्प खराब झाल्यामुळे सकल मराठा समाज यांनी 21 हजार रुपये चिल्लर गोळा करून धनादेश काढला होता आणि तो धनादेश देण्याकरता मराठा नेते ठाणे मनपा महापौर दालनात आले होते मात्र एवढीच हिम्मंत असेल तर हे निवेदन आणि चेक ठाणे मनपा आयुक्तांना द्या अशी अरेरावीची भाषा मराठा नेत्यांसोबत करण्यात आली... महापौर यांना देण्यात येणा-या निवेदनाला सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना हटकले यामुळे भडकलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी महापौरांसह दालनातील सर्वच शिवसेना नेत्यांचा समाचार घेतला आणि चिल्लर गोळा करुन जमवलेला २१ हजारांचा धनादेश शिवसेना नेत्यांसमोर फाडला...