• MyPassion
मराठी भाषा ८ वी पर्यंत सक्तीची करणं गरजेचं - मुख्यमंत्र्यांचे मत .
06 Jun, 2019

मराठी भाषा ८ वी पर्यंत सक्तीचं करणं गरजेचं आहे कारण मराठी ही महान भाषा आहे, मराठी भाषेला प्राचीन दर्जा आहे असं असलं तरी काही शाळा मराठी शिकवत नाहीत त्यातून पळवाटा काढतात खरं तर मराठी भाषा शिकवली गेली नाही तर ज्ञानाच्या खजिन्यापासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात मत व्यक्त केलय. विज्ञान ज्ञान कला या सर्वपासून मराठी भाषा समृद्ध आहे त्यामुळे ८ वी च्या पुढे ही मराठी भाषा शाळेत शिकवली गेली पाहिजे समाजामध्ये सिंघाणीया सारख्या शाळेची गरज आहेच पण जिल्हापरीषद शाळेत देखील उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे गेल्या काही वर्षात खाजगी शाळा सोडून अनेकजण सरकारी शाळेत शिकायला आलेत त्यामुळे क्वालिटी शिक्षण कडे लक्ष दिले पाहिजे भविष्यात जिल्हा परिषदेच्या १०० शाळा ह्या इंटरनॅशनल स्कूलच्या दर्जावर डेव्हलप करण्याचे काम सुरु केलय ही माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली एवढच नाही तर ७० हजार शाळांमध्ये मूल्यमापन शिक्षण शिकवले जाणार असून शिकताना देशभक्ती ही रुजवली पाहिजे यामुळे एक चांगला समाज तयार होईल असं मत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलय